सांस्कृतिक नायक बसवण्णा विशेष प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न
बेंगळूरू
लिंगायत धर्मगुरू आणि सामाज्याचे नेत्यांनी सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन सांस्कृतिक नायक विश्वगुरु बसवण्णा यांचा संदेश देण्यासाठी सरकारने विशेष कार्ययोजना तयार करून चालू अर्थसंकल्पात अनुदान देण्याची विनंती केली.
बेंगळूरू येथील मुख्यमंत्र्यांच्या कावेरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत गदागचे तोंटद सिद्धराम महास्वामीजी यांनी कार्ययोजना च्या आराखड्यातील सहा मुख्य मुद्द्यांचे आवाहन पत्र वाचून दाखवले.

निवेदन (अपील) पत्र
1) बेंगळुरू अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य रस्त्यावर बसवण्णांचा पुतळा बसवणे.
2) बंगळुरू येथे २५ एकर जागेवर विशाल ‘शरण दर्शन’ केंद्र (अक्षरधाम मॉडेलवर) उभारणे.
3) ‘शरण स्मारक संरक्षण प्राधिकरण’ ची निर्मिती.
4) निर्माणाधीन अनुभव मंटप येथे ‘वचन विद्यापीठ’ आणि संशोधन केंद्र सुरू करणे.
5) सर्व जिल्हा केंद्रांवर ‘बसव भवन’ बांधणे. त्या भवनात कर्नाटक सरकारचे कन्नड व सांस्कृतिक विभागातर्फे सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत.
6) शरण साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी समर्पित संस्थांना अनुदान देणे (उपक्रम: वचन साहित्याचा संग्रह, प्रकाशन, पुनर्प्रकाशन, हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, शरण क्षेत्रांचा अभ्यास आणि दस्तऐवजीकरण, चर्चासत्रे, परिषदा, वचनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम इ.)
तुमच्या मागण्या योग्य असून, सर्व बाजूंनी दबाव असल्याने सर्व मागण्या एकाच वेळी पूर्ण करणे शक्य नाही. हळूहळू सर्व गोष्टींचा विचार करून आराखडा तयार करू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे लिंगायत मठाधिपती लिंगायत महास्वामीजी युनियनचे सचिव शिवानंद स्वामीजी यांनी सांगितले.

गदग तोंटद सिद्धराम स्वामीजी, पूज्य गंगा माताजी, लिंगायत मठाधिपती (लिंगायत महास्वामीजी) संघटने (युनियन) चे अध्यक्ष भालकी चे डा. बसवलिंगा पट्टदेवरु , आनंदपूर मल्लिकार्जुनचे मुरुगराजेंद्र स्वामीजी, हंदिगुंद चे शिवानंद स्वामीजी, बेली मठाचे शिवरुद्र महास्वामीजी, इलकल्ल चे गुरुमहंता महास्वामीजी, बैलुरू चे निजगुणानंद महास्वामीजी, अथणीचे प्रभू चन्नबसव महास्वामिजी श्री. गो.रु.चन्नबसप्पा, भारीउद्योग मंत्री एम. बी. पाटील, बसवराज रायरेड्डी, आळंद चे आमदार बी, आर. पाटील, वन मंत्री ईश्वर खंडरे, अशोक पट्टण, शरणबसप्पा दर्शनापूर, विजयानंद काशप्पनवर, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते.
एमबी पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली
सोमवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत मंत्री एम.बी. पाटील यांचे निवासस्थानी लिंगायत मठाधीश व मान्यवरांची प्राथमिक सल्लागार बैठक झाली. बैठकीनंतर उपस्थित सर्वांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.बैठकीत बोलताना एम.बी. पाटील म्हणाले की, विशेष प्रकल्पांसाठी ५०० कोटी रुपयांची गरज असून, दरवर्षी १०० कोटी रुपयांचे अनुदान घेऊन पाच वर्षांत सर्व प्रकल्प कार्यान्वित केले जातील.
आळंद चे आमदार बी.आर.पाटील यांनी लीन्गायाय्त मठानी देणग्या गोळा करून शासनासोबत कार्यक्रम राबविण्यासाठी हातमिळवणी करावी, अशी सूचना केली.