‘वचन दर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन 9 जिल्ह्यांत झाले. त्याला प्रतिउत्तर म्हणून `वचन दर्शन मिथ्य vs सत्य,ग्रंथ 15 जिल्ह्यात प्रकाशित होणार.
बेंगळूरू
आजच्या कार्यक्रमानंतर कोणीही पुन्हा वचन दर्शन सारखे पुस्तक आणण्याचे धाडस करणार नाही, असे कर्नाटकचे उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांनी सांगितले.
गुरुवारी बेंगळूरू शहर बसव समितीच्या खचाखच भरलेल्या सभागृहात प्रो.टी.आर.चंद्रशेखर आणि मुक्ता कागली यांनी संपादित केलेल्या ‘वचन दर्शन मिथ्या vs सत्य’ या ग्रंथाच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला आणि संघ परिवाराच्या ‘वचन दर्शन’ या पुस्तकाला लिंगायत समाजाकडून मिळालेल्या तीव्र प्रतिक्रिया बद्दल ते बोलले.
“आम्ही तुमच्या अस्मितेच्या आदर करतो, पण आमच्या अस्मितेला हात घालू नका. वचन साहित्य आमची खरी, मोठी ओळख आहे.प्रत्येकाला वचने प्रसारित करण्याचा अधिकार आहे. पण हेतू योग्य असला पाहिजे. ‘वचन दर्शन’, ज्याची व्याख्या अपार्थ म्हणून करण्यात आली आहे, ते द्वेषाने भरलेले आहे. ‘मिथ्या Vs सत्य’ या ग्रंथाने अचूक उत्तर दिले असल्याचे त्यांनी ‘वचन दर्शन’ हे पुस्तक काढणाऱ्या संघ परिवारातील नेत्यांना खडाडून सांगितले.

प्रास्ताविक करणारे जागतिक लिंगायत महासभेचे महासचिव एस. एम. जमादार वचन दर्शन पुस्तक लिंगायतांनी संपादित केले होते, लेख लिंगायत लेखकांनी लिहिले होते आणि आरएसएस नेते मुकुंदा होसबाळे, बीएल संतोष यांनी प्रकाशित केले. बेली मठ, मुरुसावीर मठ, ज्ञानयोग आश्रम या लिंगायत संस्थांचा वापर करून त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाशन कार्यक्रमांमध्ये वचने मानवनिर्मित नाही असे प्रक्षोभक भाषणे करण्यात आली असे ते म्हणाले.
सर्व लिंगायत संघटनांनी वचन दर्शन पुस्तकाला विरोध केला. अस्मितेचा प्रश्न आला की, आम्ही लिंगायत लोक क्षुल्लक मतभेद विसरून एकजुटीने लढण्यास तयार आहोत, हे दाखवून दिले आहे. 9 जिल्हे आणि दिल्ली येथे वचन दर्शन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ह्याला प्रतिउत्तर म्हणून `वचन दर्शन मिथ्या Vs सत्य ग्रंथ’ 15 जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीत प्रकाशीत केले जाईल असे शिवानंद जमादार यांनी सांगितले.
टी.आर. चंद्रशेखर यांनी ग्रंथाचे परिचय करून देत, वचने ही उपनिषदांची भाषांतरे आणि वेदगमांची व्याख्या आहेत या युक्तिवादाला ‘मिथ्या Vs सत्य’ ने उत्तर दिले असल्याचे सांगून
श्री.गदग चे महास्वामिजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वचन दर्शन पुस्तकाला उत्तर देण्याचे ठरले. शिवानंद जामादारांनी माझ्याकडे पुस्तकाची जबाबदारी दिली, पुस्तक कसे आकाराला आले ते सांगितले.
2025 चे लिंगायत हे 2017 चे लिंगायत नाहीत हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आम्ही इतके दिवस आरएसएसच्या ब्राह्मणवादी अजेंड्याला प्रतिसाद देत आलो आहोत, आता त्यांना आमच्या अजेंड्याला प्रतिसाद द्यावा लागेल, असे ते म्हणाले. लिंगायतांवर सुरू असलेले आक्रमण व्यापकपणे समजून घेतले पाहिजे. भारतातील लोकशाही, राज्यघटना आणि कन्नड भाषेवर सुरू असलेल्या हल्ल्याचा हा एक भाग आहे. बहुलवादी संस्कृतीवर एक संस्कृती लादण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

पूज्य तोंटद सिद्धराम महास्वामीजी म्हणाले की, ‘वचन दर्शन’ पुस्तकाचा जन्म गदग येथे झाला. उलट सत्य सांगण्यासाठी पुस्तक तयार करण्याच्या कल्पनेचे बीजही गदगमध्येच जन्माला आल्याचे ते म्हणाले.
लिंगायतांवर सुरू असलेला हल्ला हा भारतातील लोकशाही, राज्यघटना, कन्नड भाषेवर सुरू असलेल्या हल्ल्याचाच एक भाग आहे.वचन दर्शन दगडावर काच पडली तर काच फुटते याची जाणीव संघ परिवाराला आहे. असे आळंदचे आमदार बी.आर. पाटील म्हणाले.
या बैठकीत विधान परिषदेचे सभापती, जागतिक लिंगायत महासाभाचे अध्यक्ष बसवराज होरट्टी आणि वीरशैव लिंगायत महासभेचे राज्य अध्यक्ष शंकर बिदरी(निवृत्त आयपीएस अधिकारी) यांचीही भाषणे झाली.
सर्व लिंगायत संघटनांच्या संयुक्त विध्यामाने झालेल्या गुरुवारच्या सभेच्या सुरुवातीलाच नव्या एकजुटीचा जल्लोष पाहायला मिळाला.
या कार्यक्रमात ऑनलाइन लिंगायत मासिक आणि विजयकुमारा कम्मार यांनी लिहिलेल्या ‘ वचन दर्शन एन्नुव अपसव्य आणि अदवान’ नावाचे कन्नड पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रम तपशील
सहभागी संस्था
जागतिक लिंगायत महासभा, लिंगायत माठाधीशांचे ओक्कुट, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, लिंगायत धर्म महासभा/राष्ट्रीय बसवदल आणि बसव समिती आणि इतर बसवपर संघटना. जागतिक लिंगायत महा सभाचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी)
कार्यक्रम सानिध्य भूषविल्ल्या.
लिंगायत महास्वमिजी डॉ. पंडितराध्या शिवाचार्य स्वामीजी, डॉ. तोंटद सिद्धराम स्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवार, डॉ. गंगा माताजी, श्री शिवरुद्र महास्वामी, डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, डॉ. शरश्चंद्र स्वामी, श्री श्रीकंठ स्वामी, श्री चंद्रशेखर स्वामी, श्री सिद्धलिंग स्वामी, श्री मृत्युंजय स्वामी, श्री शिवानंद स्वामी, श्री प्रभुचन्नबसव स्वामी, श्री बसवमारुळसिद्ध स्वामी, श्री बसवेश्वरी माताजी
अध्यक्षपद भूषविलेले
शरण श्री बसवराज होरट्टी (माननीय सभापती, विधान परिषद, बेंगळूरू , राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक लिंगायत महासभा )
पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. एम. बी. पाटील (माननीय भारी उद्योग मंत्री, बंगलोर, कार्याध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा, बेंगळूरू)
प्रास्ताविक
डॉ. शिवानंद जमादार (IAS (निवृत्त) महासचिव, जागतिक लिंगायत महासभा, बेंगळूरू)
पुस्तकाचा परिचय
डॉ. टी.आर.चंद्रशेखर (शरण साहित्यिक, , बेंगळूरू)
उपस्थिती : प्रा. वीरभद्रय्या (अध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा, बेंगळूरू)
डॉ. गो.रु चन्नबसवप्प (शरणा साहित्य, लोकसाहित्यकार, बेंगळूरू ) शरण श्री शंकर बिदरी (आयपीएस (निवृत्त) प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, बेंगळूरू )
स्वागत भाषण
शरण श्री बसवराज धन्नुर (उपाध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा, बेंगळूरू)
शारणु समर्पण
शरण श्री बसवराज रोट्टी (संघटन सचिव, जागतिक जागतिक लिंगायत महासभा बेळगावी)
सूत्र संचालन- कलादेगुल श्रीनिवास
Myself Prof Patwari Shivshankar, From Latur, Maharashtra, also editer of newstrends24.com.
Pls send me all details of related to the news