रेणुकाचार्य जयंतीला आमचा विरोध आहे : हालमताचे विचारवंत चंद्रकांत बिज्जरगीविजयपुर

कर्नाटक सरकारच्या वतीने रेणुकाचार्य जयंती साजरी करण्यास प्रभावशाली हालमताचे विचारवंत विजयपुराचे चंद्रकांत बिज्जरगी यांनी कडाडून विरोध केला आहे.

“ही जयंती २०२२ मध्ये राजकीय हेतूने सुरू झाली. श्री. रंभापुरी जगद्गुरुनी यासाठी एक अर्ज सादर केला. तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपले वोटबँक साठी मागे-पुढे न पाहता परवानगी दिली.
कार्नाटक सरकारने जयंती साजरी करण्यासाठी प्रथम एक समिती नियुक्त करावी लागते. त्यात तज्ञ आणि संशोधकांचा समावेश असणे आवश्यक असते. त्यांच्या अहवालाच्या आधारे सरकारला निर्णय घ्यावा लागतो “बोम्मई यांनी यापैकी कोणत्याही प्रक्रियेचे पालन केले नाही,” असे बिज्जरागी यांनी आरोप केला.

बिज्जरगी यांनी लिहिलेले ‘कुरुबर कुलगुरू रेवणसिद्ध’ ( धनगर लोकांचे कुलगुरू रेवाणसिध्द ) हे पुस्तक २००९ मध्ये प्रकाशित झाले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये संशोधन केल्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिले. “हे पुस्तक ८०० शिलालेखांचा अभ्यास करून लिहिले आहे,” असे बिज्जारगी म्हणाले.
रेणुकाचार्य हे एक काल्पनिक पात्र आहे. ‘रेणुकाचार्य’ हे नाव पहिल्यांदा विजयपुराच्या रेवणय्या यांनी १६०३ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात आढळते.

पण हालमता चे प्रसिद्ध गुरू रेवणसिध्द हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते. ते १०९५ ते ११९३ दरम्यान त्याचे कार्यकिर्द होत. त्यांनी बसवण्णांचे ज्येष्ठ समकालीन होते.

रेवणासिध्दमुळेच बाळेहळी पीठ सुरू झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा रुद्रमुनी गादीवर बसला. गेल्या ५० वर्षांपर्यंत तिथे कुरूब (धनगर) संस्कृतीच्या खुणा होत्या. तीन पिढ्यांपूर्वीचे पीठाधीपती श्री गंगाधर स्वामी, घोंगडी घालून होते आणि हातात मेंढ्या पाळण्याची काठी धरत होते.

वीरशैवांनी बाळेहल्ली पीठ ताब्यात घेतले आहे. “ते हालमत( धनगर)कडे परत मिळवण्याची व्यवस्था सुरू झाली आहे,” बिज्जरगी म्हणाले.

रेणुकाचार्य यांचा लिंगोद्भवाचा विचार २० व्या शतकाइतकाच अलीकडील आहे. मागील काळातील लिंगाची कोणतीही प्रतिमा किंवा शिल्प सापडत नाही. हरिहरच्या रगळेमध्ये, कोल्लीपेकेमध्ये पडदा ओढला गेला तेव्हा रेवणसिध्द प्रकट झाल्याचा संदर्भ आहे. त्याचा वापर करून, त्यांनी अलिकडेच रेणुकाचार्य लिंगोद्भवाची कल्पना निर्माण केली आहे.
मी वर्तमानपत्रांद्वारे आणि फोनवरून याबद्दल चर्चेसाठी येण्याचे पाच जाग्द्गुरुना आव्हान दिलो होतो. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे बिज्जरगी म्हणाले.
हालमत समाजाबद्दल जागरूकता वाढत आहे. गावागावात रेवणसिद्ध जयंती साजरी केली जात आहे.

रेणुकाचार्य जयंतीला विरोध करणारे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. मी कागिनेले येथील कनक गुरुपीठाच्या स्वामीजींनाही या जयंतीला विरोध करण्यास सांगितले आहे. “येत्या काळात आमचा संघर्ष आणखी तीव्र होईल,” असे बिज्जरगी म्हणाले.

बसवा मीडिया व्हाट्सअॅप मराठी ग्रुपमध्ये सामील व्हा (Marathi)
https://chat.whatsapp.com/EnmAuZGVJOs8kzbhvrsvtH

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *